Thursday, October 6, 2022

 जिल्ह्यातील 376 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

लाख 75 हजार 839 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला लाख 75 हजार 839 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 376 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 25 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य 29 सप्टेंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 58 गावे लम्पी बाधित आहेत. या 58 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 27 हजार 900 एवढे आहे. यातील 376 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 328 एवढी आहे. एकुण गावे 386 झाली आहेत. या बाधित 58 गावांच्या किमी परिघातील 386 गावातील (बाधित 58 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 7 हजार 809 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 25 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...