विषय शिक्षकांसाठी प्रशिक्षण
28 मार्चपर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या क. महाविद्यालय व उच्च माध्यमिक इयत्ता 11 वी व 12 वीच्या विषय शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेणे सर्व संबंधित शिक्षकांना अनिवार्य आहे.
या प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविदयालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी करुन घेण्यात येत आहे. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणास प्रविष्ठ होण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रात/ फार्म मध्ये आपली माहिती 28 मार्च 2021 पर्यंत भरावयाची आहे. त्यानंतर लगेच प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी इयत्ता बारावी मुल्यमापन आराखडा व तद्नुषंगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
आरोग्य आणि शारीरीक शिक्षण (विषय सांकेतांक-30),
चित्रकला (विषय सांकेतांक-57), संकल्पचित्र व रंगकाम (विषय सांकेतांक-58),
चित्रात्मक संकल्प (विषय सांकेतांक-59), कलेचा इतिहास व रसग्रहण (विषय
सांकेतांक-60), भारतीय संगीताचा इतिहास व विकास (विषय सांकेतांक-65), कंठ सुगम
संगीत (विषय सांकेतांक-66), संठ शास्त्रीय संगीत (विषय सांकेतांक-67), वाद्यसंगीत
(विषय सांकेतांक-68), तालवाद्य (विषय
सांकेतांक-69) या विषयांच्या विषय शिक्षकांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित
करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment