Thursday, March 25, 2021

 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राष्‍ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा (NMMS)  ही  मंगळवार 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 1.30 ते दुपारी 3 या कालावधीत जिल्ह्यातील विविध 11 केंद्रावर परिक्षा केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे.  

जिल्ह्यातील गुजराथी हायस्‍कुल वजिराबाद नांदेड या केंद्रात परीक्षार्थी संख्‍या 311, मानव्‍य विकास उ.मा.वि.देगलूर 129, मिनाक्षी देशमुख उ.मा.विद्यालय अर्धापूर 154, महात्‍मा फुले वि.बाबानगर नांदेड 257, हु.पानसरे हायस्‍कुल धर्माबाद 214, म.ज्‍योतीबा फुले हायस्‍कुल गोकूंदा किनवट 269, श्री शिवाजी हायस्‍कुल कंधार 243, जनता हायस्‍कुल नायगाव 272, पंचशील विद्यार्जन उ.मा.वि.हदगाव 253, शाहु महाराज विद्यालय भोकर 205, महात्‍मा गांधी उच्‍च मा.विद्यालय मुदखेड 199 अशी आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच ही परीक्षा ही स्वच्छ व सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टीने आणि सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य परिस्थीतीत शक्य नसल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये,  या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात मंगळवार 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच वर दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/ फॅक्स / झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. 

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...