Thursday, March 25, 2021

 

संचारबंदीला असेच सहकार्य जनतेकडून अपेक्षित 

सर्व मिळून संचारबंदी काटेकोर पाळू यात 

-         जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

·         नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 53 व्यक्ती कोरोना बाधित

·         नऊ जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे जनतेने पालन करीत चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असून पोलीस गरजूंच्या मदतीला तत्पर आहेत, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त करुन धीर दिला.  

नांदेड जिल्ह्यात गुरुवार 25 मार्च रोजी 1 हजार 53 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 3 हजार 981 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 489 तर अँटिजेन तपासणीद्वारे 564 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 53 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 36 हजार 555 एवढी झाली आहे. 

बुधवार 24 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका महिलेचा, धनेगाव नांदेड येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, गुरुवार 25 मार्च रोजी नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा, भंडारीनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 85 वर्षाच्या महिलेचा, लोहा तालुक्यातील सायाळ येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, होळी नावघाट नांदेड येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व सोमवार 22 मार्च रोजी कंधार तालुक्यातील उमरगा येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा लोहा कोविड रुग्णालय येथे तर बुधवार 24 मार्च रोजी भावसार चौक नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 683 एवढी झाली आहे. 

आजच्या 3 हजार 981 अहवालापैकी 2 हजार 788 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 36 हजार 555 एवढी झाली असून यातील 27 हजार 328 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 8 हजार 311 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 93 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 17, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 441, धर्माबाद तालुक्यांतर्गत 2, कंधार तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 6, नायगाव तालुक्यांतर्गत 4, माहूर तालुक्यांतर्गत 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 8, बिलोली तालुक्यांतर्गत 4, उमरी तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 549 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.75 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 342, भोकर तालुक्यात 7, किनवट 6, हैदराबाद 2, नांदेड ग्रामीण 20, नायगाव 10, हदगाव 1, यवतमाळ 2, बिलोली 4, लोहा 38, कंधार 1, परभणी 1, अर्धापूर 14, मुदखेड 39, मुखेड 2 असे एकूण 489 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 331, बिलोली तालुक्यात 13, हिमायतनगर 2, माहूर 24, उमरी 17, नांदेड ग्रामीण 31, देगलूर 12, कंधार 3, मुदखेड 2, अर्धापूर 16, धर्माबाद 13, किनवट 26, मुखेड 21, भोकर 12, हदगाव 9, लोहा 22, नायगाव 10 असे एकूण 564 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 8 हजार 311 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 112, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 90, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 90, मुखेड कोविड रुग्णालय 162, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 70, बिलोली कोविड केअर  सेंटर 111, नायगाव कोविड केअर सेंटर 67, उमरी कोविड केअर सेंटर 26, माहूर कोविड केअर सेंटर 41, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 60, लोहा कोविड रुग्णालय 149, कंधार कोविड केअर सेंटर 22, महसूल कोविड केअर सेंटर 101, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर 52, मुदखेड कोविड केअर सेंटर 22, अर्धापूर कोविड केअर सेंटर 50, बारड कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 914, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 353, खाजगी रुग्णालय 475, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

गुरुवार 25 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 89 हजार 489

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 46 हजार 873

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 36 हजार 555

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 27 हजार 328

एकुण मृत्यू संख्या-683

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.75 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-109

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-414

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8 हजार 311

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-93. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...