केळी पिकाच्या संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड (जिमाका) दि. 25 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून केळी पिक संरक्षणासाठी जिल्ह्यात
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
केळीबाग ही तणविरहीत व स्वच्छ ठेवावी. केळी बागेतील तण हाताने किंवा कोळपणी करुन काढावे. लागवडीनंतर 5 महिन्यांपर्यत वेळोवेळी पाण्याचा निचरा करावा. केळीचे रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढून बागेबाहेर आणून नष्ट करावा. बागेतील वाळलेली लटकणारी पाने काढून टाकावीत,
असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment