निजामकालीन
संक्रमण काळातील अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो
-
पालकमंत्री
अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 10 :- निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्ती मिळावी यासाठी जो मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, त्या संक्रमण
काळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून, एक साक्षीदार म्हणून जेष्ठ साहित्यिक
तु.ष. कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जायचे. मराठी साहित्याच्या कवितेपासून ललित लेखनापर्यंत
व समिक्षेचाही प्रांत त्यांनी समन्वयाच्या भुमिकेतून हाताळत मराठी साहित्यात वेगळी
प्रतिभा निर्माण केली. नांदेड येथील रहिवासी असल्याने स्वाभाविकच त्यांचा सर्वांना
अभिमान राहिला. प्रज्ञा भास्कर आचार्य नरहर कुरुंदकर , जेष्ठ संपादक स्व. अनंतराव
भालेराव, वा. ल. कुलकर्णी, स.मा.गर्गे अशा मराठवाड्यातील सारस्वतांच्या प्रवाहातील
ते एक प्रवाही व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने निजामकालिन संक्रमण काळातील
अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो आहोत. या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी शोक संदेशात आपल्या भावना व्यक्त केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment