Tuesday, September 25, 2018


स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत
माजी सैनिकांचा जाहूर येथे गुरुवारी मेळावा  
नांदेड, दि. 25 :- स्वच्छता ही सेवा अभियान पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांचा स्वच्छता जागरुकता मेळावा गुरुवार 27 सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील जाहूर येथे सकाळी 10 वा. आयोजित केला आहे. माजी सैनिकांनी जाहूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.  
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती निमित्त  संपुर्ण देशात  स्वच्छता अभियान ही मोहीम 15 सप्टेंबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने जिल्हयातील माजी सैनिकांना या अभियानात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक तालूक्यातील  माजी सैनिक  संघटनेच्यावतीने  हे अभियान राबविण्यात येत आहे. जाहूर येथील  मेळाव्यात जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी सहभागी होउन स्वच्छतेविषयीची  शपथ घेणे, आपल्या गावातील परिसर स्वच्छता विषयी कार्यक्रमाचे आयोजन करणे व हा कार्यक्रम निरंतर पुढे सुरु ठेवण्याविषयी  मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.   
यावेळी  नांदेड ईसीएचएस अधिकारी मेजर बिक्रमसिंह थापा,  सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे, जाहूर गावचे सरपंच माजी सैनिक नामदेव पाटील,  माजी सैनिक सार्जेन्ट संजय पोतदार, पठाण हयुन, व्यंकट देशमुख, देगलूर सुभे. हिंगोले, माजी सैनिक रमेश कांबळे,  कंधार येथील उत्तम केन्द्रे आदी उपस्थित राहणार आहेत. 
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...