Wednesday, October 5, 2016

नांदेड शहरात दोन दिवस
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 5 :- दसरा, रावणदहन मंगळवार 11 ऑक्टोंबर रोजी व शिख बांधवांचा हल्लाबोल मिरवणूक बुधवार 12 ऑक्टोंबर 2016 रोजी तसेच नांदेड जिल्ह्यात  दुर्गादेवी / शारदादेवी  विसर्जन होणार आहेत. त्यासाठी 11 व 12 ऑक्टोंबर या दोन्ही दिवशी नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.     
उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दि. 11 व 12 ऑक्टोंबर 2016 रोजी दसरा, रावणदहन व शिख बांधवांचा हल्लाबोल मिरवणूक, दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन निमित्ताने नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील  सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बिआर 2 व ताडी विक्रीच्या  अनुज्ञप्त्या अंतर्गत  व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1148 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी...