Wednesday, September 9, 2020

 

विकेल ते पिकेल अभियानाच्या शुभारंभानिमित्त

मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्यातील शेतकरी चिंतामुक्त व्हावा व शेतकरी केंद्रीत कृषि विकास साधल्या जावा या उद्देशाने विकेल ते पिकेल अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व परिवर्तन अभियानाच शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक विकास चंद्र रस्तोगी, कृषि आयुक्त धीरजकुमार यांची उपस्थित असेल. या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शासनाच्या विविध कृषि विषयक योजनासंदर्भात उद्या गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम ऑनलाईन असुन तो कृषि विभागाच्या यु-ट्युब चैनल http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर दुपारी 12 ते 1.30 यावेळेत लाईव्ह प्रसारीत होईल. राज्यातील शेतकरी, महिला नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत बाजारातील मागणीनुसार पिकेल व कृषिपुरक उत्पादनाचे नियोजन, विविध पिकांच्या कार्यक्षम मुल्यसाखळीचा विकास, शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी करार शेती, निर्यातक्षम पिकाचे उत्पादन व निर्यातवाढ, शेतीमालाच्या काढणी पश्चात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक याचा अंर्तभाव असेल. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या जागतिक बँक आर्थसहाय्यीत प्रकल्पामध्ये लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मुल्यसाखळी विकासासाठी शासनातर्फे मदत करणे, ग्रामविकास समिती स्थापन करुन गावपातळीवर कृषि विकासाचे सुक्ष्म नियोजन व अंमलबजावणी, कृषि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी जमिनीचे आरोग्य व सेंद्रीय शेती धोरण अंतर्गत कार्यक्रम आदी बाबी राज्याच्या कृषि विभागातर्फे घेतल्या गेल्या आहेत.  

 

या ऑनलाईन संवादात मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी शेतकरी केंद्रीत कृषि विकास विचार मांडतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. ज्या शेतकरी बांधवांकडे नेट आहे अशा शेतकरी बांधवांनी या लाईव्ह संवादास आवर्जून हजेरी द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...