ग्रंथपेढी योजनेबाबत समाज कल्याणचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ग्रंथपेढी योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली
जाते. ज्या महाविद्यालयाकडे पुढील अभ्यासक्रम राबविले जातात त्यांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्तीधारक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची यादी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन
करण्यात आले आहे.
तसेच ज्या महाविद्यालयांनी मागील तीन वर्षात या योजनेचा
लाभ घेतला नाही. त्यांनीच ग्रंथालयात पुस्तके मागणीबाबत प्रस्ताव सादर करावे. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे - पदवी (मेडिकल आणि इंजिनिअरिंग), पदवी (पशुवैद्याकिय), पदवी (कृषी), तंत्रनिकेतन (पॉली), पदव्युत्तर
( मेडिकल, इंजिनिअरिंग, अॅग्री, पशुवैद्याकिय ), पदवी व पदव्युत्तर (विधी), एम.बी.ए. याप्रमाणे ग्रंथपेढी प्रस्ताव गुरुवार 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत
सादर करावे, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment