वेतन पडताळणी पथकाचा
नोव्हेंबर 2016
महिन्याचा दौरा
नांदेड, दि. 15 :- वेतन पडताळणी
पथकाचा माहे नोव्हेंबर
2016 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे
सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय
व बुधवार 23 नोव्हेंबर ते
शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016
या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे
पथक
या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर
करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत
जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके
पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा
निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त
प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना
संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन
करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि
पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे
त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit
करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी
पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह
सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे सूचित केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment