Thursday, February 23, 2023

 वृत्त क्रमांक 81   

 

नांदेड जिल्ह्यात पाचशे आपदा मित्रांना प्रशिक्षण 

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनवी दिल्ली पुरस्कृतराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांचे मार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात 12 दिवसांच्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचची सुरुवात 26 डिसेंबर 2022 पासून झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्‍ह्यातील 500 स्वयंसेवकांना 12 दिवसांची एक बॅच याप्रमाणे सात बॅचमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

या योजनेअंतर्गत आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 7 दिवसाची थेअरी व 5 दिवसाचे प्रात्यक्षिक या गोष्टींचा समावेश होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी हा आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षित 500 आपदा मित्रांना  ओळखपत्र,  गणवेशआपत्कालीन प्रतिसाद किट व शासनाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठविष्णुपुरी नांदेड व जिल्हा प्रशिक्षण केंद्रहोमगार्ड कार्यालयनांदेड या ठिकाणी घेण्यात आला.

 

कोणतीही आपत्ती आल्यावर पहिल्या एका तासात जर मदत कार्यास सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याचा धोका टळतो. हीच गोल्डन अवरची गरज व आपत्ती व्यवस्थापनात जनतेचा सहभाग लक्षात घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016 मध्ये देशातील 25 राज्यातील 30 जिल्ह्यांमधून प्रायोगिक तत्वावर आपदा मित्र या योजनेची सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यामधून 200 याप्रमाणे एकूण 6 हजार आपदा मित्र प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेची सफलता लक्षात घेऊन 28 सप्टेंबर 2021 रोजी देशातील 350 जिल्ह्यांमधून ही योजना राबवून त्यातून 1 लाख आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट होते.

 

यामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. यामध्ये काही जिल्ह्यांना 200 तर काही जिल्ह्यांना 300 व काही जिल्ह्यांना 500 आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. यामध्ये 500 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याने पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण वेळेवर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरनिवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरीउप विभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे तसेच महसूल सहाय्यक पिंटू सपकाळबालाजी चौहाण यांनी काम पाहिले.

0000    

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...