Friday, August 18, 2023

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

      

नांदेड (जिमाका) दि. 18 :- महिला व बाल विकास मंत्रालयभारत सरकार यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार 2024 हा शिक्षणकला सांस्कृतिक कार्यखेळ, नाविन्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त करण्याची  प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या दिनांक 31 ऑगस्ट 2023 र्यं www.awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

 

नांदेड जिल्ह्यातील वर नमूद क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेल्या बालकांनी या पुरस्काराकरीता मुलांच्या विकास,  संरक्षण व कल्याण या क्षेत्रात विनावेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान वर्षे काम करणाऱ्या व्यक्ती तसेच  बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्था यांनी  दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...