वृत्त क्र. 55
रस्ता सुरक्षा अभियानातर्गत
हेल्मेट जनजागृती रॅली संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. त्याअनुंषगाने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे उद्घाटन सकाळी 8.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.
या रॅलीत परिवहन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक वाहन वितरक व सामान्य नागरिक इत्यादी सुमारे 200 ते 220 अधिकारी / कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. ही हेल्मेट रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील प्रमुख रस्ते व एसपी ऑफीस चौक, कलामंदीर, आयटीआय चौक, श्रीनगर, राज कॉर्नर मार्गे साठे चौक, जुना मोंढा कौठा, लातूर फाटा, सिडको मार्गे एकूण 21 किमीचे अंतर पार करत प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये 35 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते. शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व सुभाषचंद्र मारकड हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मंजूषा भोसले, गणेश तपकीरे व निलेश ठाकूर, संघपाल कदम सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या हेल्मेट रॅलीद्वारे ‘हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त नांदेड' असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
0000
No comments:
Post a Comment