Thursday, January 18, 2024

  वृत्त क्र. 56 


रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

विविध उपक्रमाद्वारे मार्गदर्शन  

 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड शहर व जिल्ह्यातील काही पेट्रोलपंप तसेच प्रमुख चौकात रस्ता सुरक्षा संदर्भात बॅनर्स, माहितीपत्रके व भित्तीपत्रके नुकतेच लावण्यात आली. तसेच नांदेड, नायगाव, मालेगाव येथील प्रमुख चौकांमध्ये वाहनचालक, नागरिकांना जवळपास 1 हजार 400 माहिती पुस्तिका व रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.  

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, गणेश तपकीरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, निलेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात यावेळी मार्गदर्शनही करण्यात आले.

0000





No comments:

Post a Comment

विशेष लेख                                                                                                                                  ...