Friday, May 31, 2024

वृत्त क्र. 453

 जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा


नांदेड दि. 29 :- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय व सर्व आरोग्य संस्थेमध्ये 28 मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती होती. मासिक पाळी दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळीविषयी समाजात असलेले समज -गैरसमजा बद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

 

मासिक पाळी म्हणजे काय व सॅनेटरी पॅडचा उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मासिक पाळीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आहार कसा घ्यावा, योगा हा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याविषयावरही नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण, नातेवाईक यांना माहिती सांगितली.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...