पेठवडज जिल्हा परिषदेच्या
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नांदेड दि. 20 :- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील
रिक्त पदांचा पोटनिवडणूक डिसेंबर 2019 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार
महाराष्ट्र
जिल्हा परिषद (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम 1962 चे कलम 11 अन्वये, पोट-नियम (1-अ)
याद्वारे अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कंधार तालुक्यातील 50-पेठवडज
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची अनुसूची प्रसिद्ध केली आहे.
पेठवडज जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी
नामनिर्देशन
पत्र सादर करण्याचा कालावधी शुक्रवार 22 नोव्हेंबर ते बुधवार 27 नोव्हेंबर 2019 रोजी
सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत राहील. (रविवार 24 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने
नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत). तहसिलदार कंधार यांच्या कक्षात नामनिर्देशन पत्रांची छाननी
गुरुवार
28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात गुरुवार 12 डिसेंबर
2019 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 पर्यंत
घेण्यात येईल. मतमोजणी मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, कंधार शुक्रवार 13 डिसेंबर 2019 सकाळी
10 वाजेपासून होईल.
निवडणुकीच्या तारखांची सुचना
व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख शुक्रवार 22 नोव्हेंबर
2019 ही राहील. संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी
स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार 22 ते बुधवार 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत सकाळी 11 ते
दुपारी 3 पर्यंत राहील. रविवार 24 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने
नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय
देणे गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजेपासुन. वैध उमेदवारांची यादी गुरुवार
28 नोव्हेंबर 2019 रोजी छाननीनंतर लगेच प्रसिध्द करण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते
नामंजुर करण्याबाबतचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा
न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख सोमवार 2 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा न्यायाधिशांनी
अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख गुरुवार 5 डिसेंबर 2019 रोजी.
जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे
गुरुवार 5 डिसेंबर 2019 रोजी, उमेदवारी मागे घेणे जेथे अपील नाही तेथे बुधवार 4 डिसेंबर
2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. जेथे अपील आहे तेथे शनिवार 7 डिसेंबर 2019
रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द
करणे व निशाणी वाटप जेथे अपील नाही तेथे बुधवार 4 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर.
जेथे अपिल आहे जेथे शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर. मतदानाची तारीख
गुरुवार 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत राहील. मतमोजणीची तारीख शुक्रवार 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेपासुन. निवडूण
आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार 17 डिसेंबर 2019 पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार
आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड
यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment