Friday, January 19, 2018

आराखड्यानुसार जलयुक्तची
कामे वेळेत पूर्ण करावीत  
- पालक सचिव एकनाथ डवले
नांदेड दि. 19 :- जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मनरेगाची कामे आराखड्यानुसार कामे वेळेत व नियोजनबद्ध पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी आज दिले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  
बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहु, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधीत विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.  
श्री. डवले म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही शासानाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची कामे येत्या जुनपर्यंत पूर्ण करावीत. पावसाचा थेंब-न-थेंब वाचविण्याची आणि उपयोगात आणण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झाली आहेत. तसेच मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचे जियो टॅगिंगची कामे व छायाचित्र आपलोड करण्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच कृषी, वन, लघुसिंचन (जसं), लघुपाटबंधारे (जि.प.), पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत छायाचित्रे अप आदि विषयांवर उपयुक्त सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात आलेली गावे व कामांची माहिती  सादरीकरणाद्वारे दिली. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये एकुण 8 हजार 220 कामे पूर्ण झाल्याची माहिती दिली.
यावेळी पालक सचिव श्री डवले यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 2017-18 करिता सर्वसाधारण , अनुसचित जाती  उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत डिसेंबर 2017 अखेर मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद आणि झालेल्या खर्चाचा आढावा घेतला.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...