मराठी ज्ञानभाषेसोबत जनभाषा व्हावी
- प्रा. विश्वाधर देशमुख
नांदेड, दि.
19 :- मराठी भाषेकडे केवळ
एक भाषा म्हणून बघू नका
मराठी ज्ञानभाषा न
रहाता ती जनभाषा होण्याची गरज
असल्याचे प्रतिपादन विख्यात साहित्यिक प्रा. विश्वाधार देशमुख यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतन,
नांदेड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात आयोजित व्याख्याना प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी.
डी. पोपळे हे
होते.
प्रा. देशमुख यांनी मराठी भाषेचे महत्व विशद
करतांना मराठी भाषा
संवर्धनासाठी युवा वर्गाची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. मराठी भाषेत इतर भाषेची सरमिसळ झाल्याने मराठी भाषा
आता पिजन झालेली आहे. मराठी भाषेला आपली
जीवन दाहिनी करुयात मातृभूमी, मातृभाषा व माता
यांच्यावर आपण प्रेम करुन ऋण
फेडले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कविताचा माध्यमातून युवा
विद्यार्थ्यांची मने प्रा. विश्वाधर देशमुख यांनी जिंकले.
अध्यक्षीय समारोपात संस्थचे प्राचार्य पोपळे यांनी मराठी भाषेला आपण
शालेय जीवनापासून टाळतो. आपलीच भाषा
आपल्याला अवघड वाटते. वास्तविकत: मराठीचे महत्व वैश्विक स्तरावर नेण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मराठीला जपावे असा संदेश त्यांनी दिला.
याअंतर्गत "मराठी असे अमुची मायबोली" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ऋषीकेश अमलापुरे यांना प्रथम, जाधव प्रवीण यास द्वितीय तर
प्रोत्साहनपर बक्षिस पवन
तिवारी, स्वप्नील वट्टमवार यांना देण्यात आले. यावेळी प्रा. सकळकळे,
प्रा. ए. एम.
लोकमनवार, प्रा. कदम
प्रा. कळसकर प्रा. राठोड प्रा. मुधोळकर हे
उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी केले तर
मान्यवर पाहुण्यांचा परिचय डॉ. ए.
ए. जोशी यांनी केला. सुत्रसंचलन कु. आर.
के. देवशी यांनी केले तर
अभार डॉ. बिट्टेगिरी यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment