Wednesday, October 3, 2018

शौर्यदिन उत्साहात साजरा  
सैनिकांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केला सत्कार
नांदेड, दि. 3 :- शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी उपस्थित विरनारी, विरपिता व ऑपरेशनमधील अपंग माजी सैनिक, माजी सैनिकांचा सत्कार केला.
यावेळी विरनारी श्रीमती अरुणा टर्के, श्रीमती शितल कदम, श्रीमती ज्योती थोरात, विरपिता धोंडीबा जोंधळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे, ऑन कॅ. जाधव यांच्यासह  जवळपास 110 माजी सैनिक उपस्थित होते. तसेच कर्नल विकास शांडीले, कमान अधिकारी, 52 महा. बटालियन, एनसीसी व त्यांच्यासोबत 8 सेवारत सैनिक, मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी  शौर्यदिनाचे महत्व सांगून विरमाता, वीरपत्नी  व  सर्व  माजी सैनिकांनी केलेल्या त्यागाबाबत व सेवेबाबत आभार व्यक्त केले. सैनिकांच्या अडीअडचणी असल्यास नि:संकोचपणे मांडव्यात असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी मेजर  बिक्रमसिंग थापा व मा सै ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे  यांनी  सर्जीकल स्ट्राईक व भारताची सैन्य ताकद याची माहिती दिली. सुरुवातीला शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी शौर्य दिन साजरा करण्याबाबत शासनाची भुमिका सांगितली. सुत्रसंचालन माजी सैनिक अजय कानोले यांनी केले तर आभार माजी सैनिक पी. झगडे यांनी मानले. या कार्यक्रमास सैनिकी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...