पंचायत समिती सभापती पदांच्या
आरक्षित पदांची सोडत संपन्न
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यातील 16 पंचायत समिती सभापती
पदांच्या आरक्षित पदांची सोडत पंचायत समिती निहाय वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील आयोजित बैठकीत
पंचायत समिती निहाय सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत आज काढण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, तहसिलदार (सामान्य) प्रसाद
कुलकर्णी, नायब तहसिलदार संजीवनी मुकडे, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र
शासनाने ग्रामविकास यांच्याकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब अंक 151 (8)
बुधवार 27 नोव्हेंबर 2019 अन्वये जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समीतींमधील सभापती पदाच्या विद्यमान आरक्षणाची संपल्याच्या दिवसानंतर लगतच्या दिवसापर्यंत सुरू होणाऱ्या उर्वरीत कालावधीकरीता
(दिनांक 21 डिसेंबर 2019 पासुन) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती, भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलांसह) सोबतच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे विनिर्दिष्ट केली आहे.
अ.क्रं.
|
प्रवर्ग
|
पंचायत समिती संभापती करीता निर्धारीत
आरक्षण
|
पंचायत समिती सभापती करीता निर्धारीत
महिला आरक्षण
|
1
|
अनुसूचित जाती
|
03
|
02
|
2
|
अनुसूचित जमाती
|
02
|
01
|
3
|
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
|
04
|
02
|
4
|
सर्वसाधारण
|
07
|
04
|
एकुण
|
16
|
09
|
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणुक) नियम 1962 च्या नियम 2 (फ) च्या उपकलम 2(अ), 2(ब), 3(अ), 3(ब), 4(अ), 4(ब), 5(अ), 5(ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्याचे अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्यांकरीता, पंचायत समितींमधील सभापतीच्या पदाच्या आरक्षणाची मुदत संपल्याच्या दिनांकानंतर येणाऱ्या लगतच्या दिवसापासुन सुरु होणाऱ्या उर्वरीत (दिनांक 21 डिसेंबर, 2019 पासुन) कालावधी करीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती, भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलांसह) सोडतीव्दारे सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे आरक्षण नेमुन दिले आहे.
अ.क्र.
|
पंचायत समिती नाव
|
आरक्षण
|
1
|
उमरी
|
अनुसूचित जाती (महिला)
|
2
|
अर्धापुर
|
अनुसूचित जाती (महिला)
|
3
|
मुदखेड
|
अनुसूचित जाती
|
4
|
हदगांव
|
अनुसूचित जामाती (महिला)
|
5
|
देगलुर
|
अनुसूचित जमाती
|
6
|
धर्माबाद
|
नागरिकांचा मागास प्रवर्ग
|
7
|
बिलोली
|
नागरिकांचा मागास प्रवर्ग
|
8
|
हिमायतनगर
|
नागरिकांचा मागास प्रवर्ग
(महिला)
|
9
|
माहुर
|
नागरिकांचा मागास प्रवर्ग
(महिला)
|
10
|
नांदेड
|
सर्वसाधारण (महिला)
|
11
|
कंधार
|
सर्वसाधारण (महिला)
|
12
|
भोकर
|
सर्वसाधारण (महिला)
|
13
|
किनवट
|
सर्वसाधारण (महिला)
|
14
|
लोहा
|
सर्वसाधारण
|
15
|
नायगांव खै.
|
सर्वसाधारण
|
16
|
मुखेड
|
सर्वसाधारण
|
00000
No comments:
Post a Comment