स्कुलबस धोरणाबाबत
मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 13 :- प्रादेशिक परिवहन
कार्यालय तसेच शिक्षण विभाग
महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त
विद्यमाने स्कुल बस धोरण-2011 अंतर्गत
शालेय विद्यार्थी वाहतुक सुरक्षीतपणे
होण्यासाठी नांदेड तालुक्यातील सर्व
शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा
आज श्री सचखंड
गुरु ग्रंथभवन नांदेड येथे आयोजीत करण्यात
आली होती.
या कार्यशाळेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश
राऊत, सहा. प्रा.परिवहन
अधिकारी रोहीत काटकर, मनपा शिक्षणाधीकारी डी. आर. बनसोडे, प्राचार्य तथा
उपप्रबंधक गुरुव्दारा सचखंड बोर्डचे रंजीत सिंग चिरागिया
तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था खालसा
स्कुलचे प्राचार्य बच्चनसिंग, मोटार वाहन निरिक्षक श्री चव्हाण, श्री यादव, शाळेचे मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपीक
श्री गाजुलवाड, श्री पवळे व क.लिपीक काकडे
या कार्यशाळेत उपस्थित
होते.
उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी अविनाश राऊत यांनी
स्कुल बस धोरण 2011 अंतर्गत असलेल्या
नियमांची मुख्याध्यापकांना माहिती
दिली. या नियमावली अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्याची
माहिती दिली. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका
क्र.97/2011 मधील दि.25-11-2019 च्या
आदेशान्वये ऑटोरिक्षा मधुन विद्यार्थ्याची वाहतुक करणे धोकादायक
असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना
ऑटोरिक्षामधून प्रवास करण्यास मनाई
करतील याबाबतची न्यायालयाने व्यक्त
केलेली अपेक्षेची माहितीही श्री.
राऊत यांनी दिली.
शिक्षणाधिकारी श्री बनसोडे यांनी नांदेड तालुक्यातील सर्व
मुख्याध्यपकांना स्कुल बस धोरण 2011 च्या
अनुषंगाने माहिती दिली व काही
अडचणी असल्यास त्यांना कळविण्याचे
आवाहन केले. सहाय्यक
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री
काटकर यांनी प्रस्ताविक केले.
00000
No comments:
Post a Comment