Thursday, April 4, 2019


निवडणूक खर्च निरीक्षणासाठी
5, 10 व 16 एप्रिल तारखा निश्चित
        नांदेड, दि. 4 :-  16- नांदेड लोकसभा निवडणूकीकरीता उमेदवारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या नियोजित वेळापत्रकानुसार प्रत्‍येक उमेदवारास स्‍वतःचा खर्च निरिक्षणासाठी खर्च निरिक्षकासमोर सादर करावयाचा असतो. त्‍यासाठी 5 एप्रिल, 10 एप्रिल व 16 एप्रिल 2019 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर कॅबिनेट हॉल नियोजन भवन नांदेड येथे सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत स्‍वीकारण्‍यात येणार आहेत. 
 16- नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी उमेदवारांनी  स्‍वतः किंवा आपल्‍या प्रतिनिधीमार्फत निवडणूकीसाठी झालेला आपला खर्च निरीक्षणासाठी सादर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...