Monday, January 11, 2021

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क

अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 


नांदेड (जिमाका) दि.
 11 :- जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत.जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करु असा सक्त इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.


आज रात्री 8-00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून कोरोना लसीकरण आणि बर्ड फ्ल्यूबाबतच्या नियोजनाबाबत आढावा घेवून निर्देश दिले. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शरद पाटील, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...