Wednesday, May 11, 2022

 ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव स्विकारण्‍यास 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ

 

·         ग्रामीण भागातील भुखंड गुंठेवारी प्रमाणपत्राचे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्‍ते वाटप  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- गुंठेवारीचे बरेच प्रस्‍ताव दाखल करावयाचे शिल्‍लक असल्‍याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल करण्‍यास गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्‍ते ग्रामिण भागातील भुखंडाच्या गुंठेवारी प्रमाणपत्रचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्‍यात आले.    

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नांदेड जिल्‍हयातील महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगर रचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्या मार्फत छाननी शुल्‍कासह प्रस्‍ताव दाखल करण्यास 3‍0 एप्रिल 2022 पर्यत  मुदत  देण्‍यात  आली  होती. त्यास आता गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...