Wednesday, May 11, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 46 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 807 एवढी झाली असून यातील 1 लाख 112 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 337

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 302

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 807

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 112

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-03

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

 

000000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लखमापूर येथे जलताराचे उद्घाटन...