Wednesday, September 20, 2023

 वृत्त

 नीट, जेईई, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी

पात्र विद्यार्थ्यांना टॅब व सिमकार्डचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  सन 2023-24 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या व ऑनलाईन अर्ज केलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गातील पात्र विद्यार्थ्याना जेईई/ नीट/एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेल्या 75 टॅबचे वितरण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 


यावेळी समाज कल्याण अधिकारी बापू दासरीविद्यानिकेतन कमळेवाडीचे शिक्षक शिवाजी अंबुलगेकरश्रीमती मादसवार व श्रीमती केंद्रे यांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी छत्रपती शाहू महाराजमहात्मा ज्योतीबा फुले, डॉबाबासाहेब आंबेडकरसावित्रीबाई फुले या थोर महापुरुषांना अभिवादन केले.  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गातील विद्यार्थ्याना टॅब बाबत मार्गदर्शन केलेतसेच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आकाश पोपळघट या विद्यार्थ्याच्या कार्याची दखल बाहेर देशांनी घेतल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेविद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द निर्माण झाल्यास उपस्थित विदयार्थ्यामधून व विद्यार्थीनमधून सुध्दा आपल्या जिल्हयातील विद्यार्थी आकाश पोपळघट व कल्पना चावला होऊ शकतात व आपल्या देशाची मान उंचाऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

समाजकल्याण अधिकारी बापू दासरी व विद्यानिकेतन कमळेवाडी सहशिक्षक शिवाजीराव अंबुलगेकर यांनीही विद्यार्थ्यांना टॅबचे महत्व सांगितलेसहशिक्षक अंबुलगेकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयीचे महत्व सांगून थोर पुरुशांनी केलेल्या कार्यास उजाळा दिलाकार्यक्रमाचे सुत्र संचलन पांपटवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावित श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले.

00000



No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...