Wednesday, September 20, 2023

 वृत्त 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 

·    शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने महाविद्यालयांना विविध सूचना  

 

नांदेड (जिमाका) 20 :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2021-22  2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु केंद्र शासनाच्या सुधारित निधी वाटपाच्या निर्णयानुसार शासन स्तरावर उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने तसेच काही तांत्रिक कारणास्तव सन 2021-22  2022-23 या शैक्षणिक वर्षाची काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यास विलंब होत आहे व याच कारणास्तव काही महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे रोखून धरत असल्याबाबत विद्यार्थी संघटनेकडून निवेदन प्राप्त होत आहेत.

 

या अनुषंगाने बैठकीत पुढील विषयाबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय परिपत्रक 6 सप्टेंबर 2023 नुसार शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणाखाली मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे अडवणूक करण्यात येऊ नयेत त्यांना तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावे. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे शैक्षणिक कागदपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेले समान संधी केंद्र व्यवस्थित चालू ठेऊन त्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडचणी महाविद्यालय स्तरावर सोडविण्यात याव्या. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करतात त्यांची उपस्थिती देताना सदरचा विद्यार्थी नियमित महाविद्यालयात उपस्थित राहतो का याची खात्री करून विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात यावे. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यवाही करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यादी तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...