Wednesday, September 20, 2017

गोदावरी नदीकाठच्या गावांना
पूर परिस्थितीबाबत सतर्कतेच्या सूचना
नांदेड दि. 20 :- जायकवाडी धरणातील अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता असून या विसर्गामुळे नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. नागरीकांनी कुठल्‍याही प्रकारच्‍या अफवावर विश्‍वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मंगळवार 19 सप्टेंबर रोजी 88.10 टक्‍के क्षमतेने भरली आहे. उर्ध्‍व भागातील धरणांमध्‍ये जवळपास 100 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात केंव्‍हाही अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते आणि या विसर्गामुळे धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना आगामी काळात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. वेळोवेळी होणाऱ्या जलसाठा  विसर्गामुळे प्राधिकार क्षेत्रील नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...