Wednesday, September 20, 2017

दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात व शहरात शनिवार 30 सप्टेंबर 2017 रोजी दसरा व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, शनिवार 30 सप्टेंबर रोजी  दसरा असल्याने जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष). एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...