Monday, November 20, 2017

सामुहिक, वैयक्तीक आदिवासी योजनेसाठी अर्ज करावीत
- अजित कुंभार   
नांदेड, दि. 20 :- केंद्रीय अर्थसंकल्प सन 2017-18 न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी शेतकरी, लाभार्थी, महिला, युवक-युवती आदींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी बुधवार 13 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करावीत, असे आवाहन किनवटकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.    
वैयक्तीक, सामुहिक योजनेंतर्गत 85 100 टक्के अनुदानावर विविध साहित्यांचा पुरवठा रण्यात येणार आहे. यासाठी व्यवसाय प्राप्त होण्याच्यादृष्टीने  विविध प्रशिक्षण नामांकि पात्रताधारक संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. आदिवासी लाभार्थ्यानी  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे माहिती सुविधा केंद्रापरिपुर्ण अर्ज भरुन बुधवार 13 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. विहित नमुन्यातील कोरे अर्ज माहिती सुविधा केंद्राउपलब्ध आहेत. अधीक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांचेशी संपर्क साधावा.
योजनेचे नाव, लाभ व आवश्यक लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील. योजनेचे नाव- आदिवासी शेतकऱ्यांना तुषारसंच  85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे - योजनेचा लाभ- वैयक्तीक - जातीचे प्रमाणपत्र ,  रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र , 7/12 उतारा, होल्डींग  ,  विहिर, बोअर  सुविधा असल्याचे प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो. आदिवासी शेतक-यांना ठिंबक संच  85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे - योजनेचा लाभ- वैयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र,  रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र , 7 / 12 उतारा, होल्डींग  , विहिर, बोअर  सुविधा असल्याचे प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो . आदिवासी शेतकरी,लाभार्थ्याना 85 टक्के अनु. काटेरी तार पुरवठा करणे- योजनेचा लाभ वयक्तीक-जातीचे प्रमाणपत्र ,  रहिवासी प्रमाणपत्र , 7 / 12 उतारा, होल्डींग, आधार कार्ड प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो. आदिवासी महिलांना, युवतीना शिलाई युनिट 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे- योजनेचा लाभ-वैयक्तिक- जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र , शिवणकला प्रमाणपत्र नांमाकित संस्थेचे, तथा ईन्स्टयुटचे, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो.  आदिवासी महिलांना,युवतीना शिलाई युनिट 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे- योजनेचा लाभ वयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र,  रहिवासी प्रमाणपत्र , शिवणकला प्रमाणपत्र नामाकित संस्थेचे, तथा ईन्स्टयुटचे, आधार कार्ड , पासपोर्ट फोटो. आदिवासी शेतक-यांना ताडपत्री  85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे- योजनेचा लाभ वैयक्तीक -जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र(सरपंच) ,  7/12 उतारा होल्डींग टोचनकाशा , आधार कार्ड प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो. - आदिम आदिवासी लाभार्थ्याना 100 टक्के अनुदानावर मंडप साहित्य (शामियाना, सांऊड अनुषंगीक साहित्य) चा पुरवठा करणे- योजनेचा लाभ वयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) ,आधार कार्ड प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो आदी.  आदिवासी लाभार्थ्याचे घरांचे विद्युतीकरण (2.5 ईलेक्ट्रीक फिंटीग) करणे- योजनेचा लाभ -यक्तीक, सामुहिक - जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी  युवतीना शाळा/कॉलेज मध्ये ये-जा करण्यासाठी  सायकल पुरवठा करणे- योजनेचा लाभ वैयक्तीक-जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र , आधार कार्ड प्रमाणपत्र , शाळा, कॉलेज शिक्षण घेत असलेले बोनाफाईड , पासपोर्ट फोटो.  आदिवासी युवक, युवतीना एमएसआयटी संगणप्रशिक्षण देणे- योजनेचा लाभ वयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र , शैक्षणिक प्रमणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच), आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी युवक, युवतीना टंकलेखन  प्रशिक्षण देणे - योजनेचा लाभ -वयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र , शैक्षणिक प्रमणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र(सरपंच), आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी युवक, युवतीना प्लेक्स प्रिंटींग मशिन ऑपरेटर करण्याचे प्रशिक्षण देणे- योजनेचा लाभ -यक्तीक -जातीचे प्रमाणपत्र , शैक्षणिक प्रमणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. शासकिय आदिवासी आश्रमशाळा मधील विध्यार्थ्याची कला जोपासण्यासाठी गायन, हॉर्मोनिअयम  शास्त्रीय गायन, नृत्य सुगंम संगीत योजना- योजनेचा लाभ वयक्तीक- जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) ,आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी महिलांना, युवतीना ब्युटी पार्लर अनिवासी प्रशिक्षण देणे- योजनेचा लाभ वयक्तीक - जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी युवक, युवतीना Neet परिक्षा पुर्व प्रशिक्षण देणे- योजनेचा लाभ - वयक्तीक-जातीचे प्रमाणपत्र, बारावी विज्ञान शिक्षण घेत असलेले बोनाफाईड , रहिवासी प्रमाणपत्र , आधार कार्ड प्रमाणपत्र,  पासपोर्ट फोटो. आदिवासी युवक, युवतीना रुग्सहायक, रुग्नसहायीका अभ्यासक्रम निवासी प्रशिक्षण देणे - योजनेचा लाभ-यक्तीक-जातीचे प्रमाणपत्र ,  शैक्षणिक प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र(सरपंच),  आधार कार्ड प्रमाणपत्र,  पासपोर्ट फोटो. आदिवासी युवकांना ल्युमिनियम कामाचे प्रशिक्षण देणे- योजनेचा लाभ वयक्तीक-जातीचे प्रमाणपत्र , शैक्षणिक प्रमणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र(सरपंच) , आधार कार्ड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो. आदिवासी बचत गटाना आचारी साहित्य संच  85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे. 2016-2017- योजनेचा लाभ- सामुहिक-जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र , पासपोर्ट फोटो , आदिवासी बचत गटाचा ठराव प्रत. आदिवासी भजनी मंडळास 85 टक्के अनुदानावर भजनी साहित्य पुरवठा करणे. 2016-2017- योजनेचा लाभ -सामुहिक -जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र , पासपोर्ट फोटो  गावातील सरपंच/ ग्रामसेवक यांचा ठराव प्रत. आदिवासी महिलाना, युवतीना ब्युटीपार्लर किट पुरवठा 85 टक्के अनुदानावर करणे.2016-2017- योजनेचा लाभ यक्तीक- जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र (सरपंच) , आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र , पासपोर्ट फोटो , ब्युटी पार्लर प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्था प्रमाणपत्र आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...