ग्रंथालयाने "वाचन प्रेरणा दिन" साजरा करावा
- जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुनिल हुसे
नांदेड, दि. 12 :- देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस
जिल्हयातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांनी
"वाचन
प्रेरणा दिन" म्हणुन साजरा
करावा, असे आवाहन जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे
यांनी केले आहे.
ग्रंथालयांनी
15 ऑक्टोंबर
रोजी वाचन संस्कृती संबंधी
व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, ई-बुक्सचे
सामुहिक वाचन आदीचे आयोजन करावे. तसेच
ग्रंथप्रदर्शन, निवडक कथा, कविताचे अभिवाचन करणे, निबंध
स्पर्धा किंवा एखाद्या लेखकाची
प्रकट मुलाखत घेणे, आवडीच्या पुस्तकावर
मनोगत व्यक्त करणे, सलग
काही वेळ शांतपणे वाचनाचा
उपक्रम, वृत्तपत्रातील अग्रलेख
किंवा प्रमुख लेखांचे वाचन या प्रकाराच्या कार्यक्रमाचे
आयोजन करावे. तसेच "वाचन
प्रेरणा दिन" कार्यक्रमाचा अहवाल
जिल्हा ग्रंथालय कार्यालयास सादर
करावा, असे आवाहनही जिल्हा
ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी
केले आहे.
000000
No comments:
Post a Comment