Saturday, June 17, 2017

जप्त रेतीसाठ्याचा दुसऱ्या फेरीचा
तहसिल कार्यालयात सोमवारी लिलाव
 नांदेड दि. 17नांदेड तालुक्यातील विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागपुर या ठिकाणचा अंदाजे 3 हजार 115 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा दुसऱ्या फेरीचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली सोमवार 19 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाण रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  सुधारित वृत्त  वृत्त क्रमांक 657   आणीबाणी च्या विविध घटनांच्या छायाचित्र  प्रदर्शनाचे  आज  उद्घाटन   नांदेड दि.  24  जून :-  देशात दिनांक...