Tuesday, August 29, 2023

वृत्त

 

नोंदणीसाठी बांधकाम कामगारांनी

खाजगी एजंटपासून सावध राहा

 

नांदेड (जिमाका) 29 :- जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी करताना मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक रुपये इतके शुल्क ऑनलाईन भरावे लागते. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामगारास लागत नाही. खाजगी एजंटपासून बांधकाम कामगारांनी सावधान रहावे. याचबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सुरक्षासंच व अत्यावश्यक संच व नोंदीत बांधकाम कामगारांना भोजन ही योजना सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याबाबत कोणत्या कामगाराकडे कोणीही त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ संबंधिताच्या विरोधात तक्रार करावीअसे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी मोहसीन सय्यद यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षाआरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी "इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ" या मंडळाची स्थापना केलेली आहे. सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयामार्फत चालविण्यात येत आहे. शासन अधिसूचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षा पासून ते 60 वर्षांच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी दर वर्षाला मागील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जातोअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी मोहसीन सय्यद यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...