Tuesday, August 29, 2023

 वृत्त

 

जिल्ह्यातील इयत्ता दहावी पर्यंत शिकणारी विद्यार्थींनी

आपल्या वडिलांना पत्राद्वारे घालणार आर्त साद  

 

·  रक्षाबंधन निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

    यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

 

·  जिल्हा परिषदेचा पुढाकार

 

नांदेड (जिमाका) 29 :-  यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नकाअशी आर्त हाक देणार आहेत.  

 

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने विविध कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. तथापि जुन्या चालीरिती व कुप्रथा बाळगत अनेक पालक हे मुलींची वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आत त्यांचे बालपन व बालमन बालविवाह लावून कोमेजून टाकतात. प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपल्या मुलीच्या हिताचा दृष्टिकोन जरी असला तरी त्यांना बालविवाह लावण्याच्या विचारा पासून परावृत्त करण्यास मुलींची ही आर्त साद प्रत्येक बाबा ऐकेलअसा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.  

 

जिल्हा महिला व बालविकास विभागयुनिसेफ SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमाला आता ही एका हळव्या उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. "माझे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी माझा बालविवाह करू नकात बाबा ! मला शिक्षण घेवू द्या. मला सावित्रीची लेक बनवा आणि ज्योतिबांचा समृद्ध वारसा पुढे नेऊ द्या. माझी इच्छा पूर्ण कराल ना आई बाबा ! असे भावनिक पत्र देवून राखी पौर्णिमेची अनोखी ओवाळनी विद्यार्थींनी आपल्या आई वडिलांना मागणार आहेत.

 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बालविवाह जनजागृती संदर्भात एक अनोखा संदेश जिल्ह्यात दिला जात आहे आणि त्यासाठी पालकांचेही मुलींना सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधुन हा अभिनव उपक्रम राबविल्या जात असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगेमाध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकरजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश कांगनेजिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळनेनांदेड जिल्हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांचे या उपक्रमात विशेष योगदान लाभत आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...