Thursday, March 1, 2018


सैन्य दलात अधिकारी पदाची संधी
नांदेड दि. 1 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नाशिकरोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 13 ते 22 मार्च 2018 एकुण दहा दिवस असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आली आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 12 मार्च 2018 रोजी सकाळी 10.30 वा. छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
एसएसबी प्रवेश वर्गासाठी पुढील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (युपीएससी) उत्तीर्ण असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) प्रमाणपत्र अे / बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीतजास्त पात्र तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...