Thursday, March 1, 2018


   स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे दोन दिवस आयोजन ;
ताणतणाव, अर्थसंकल्प, पर्यावरण विषयांवर मार्गदर्शन  
नांदेड, दि. 1 :- उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने सोमवार 5 मार्च 6 मार्च 18 रोजी डॉशंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार 5 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न    होणा-या  या शिबिरा डॅा. नंदकुमार मुलमुले हे ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर तर पुणे येथील प्रा. अभिजित राठोड हे राजकोषीय धोरण, वित्तीय अर्थसंकल्प 2018  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत पुणे येथील डॉ. तुषार घोरपडे हे पर्यावरण परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणा आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...