Wednesday, January 24, 2024

 वृत्त क्र. 71

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार

उमेदवारांसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रशिक्षण

नांदेड (जिमाका) दि. 24:- राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतने व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे  उपायुक्त डॉ. बी.यु.बोधनकर यांनी केले आहे.

राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढण्यासाठी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढ होण्यासाठी ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेराजगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा आहे. यात 1 महिना क्लासरूम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश आहे. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयात तर प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय याठिकाणी घेण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 200 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, असे पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...