Friday, September 8, 2023

 इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ

होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  फेब्रु-मार्च-2024 च्या इयता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नं. 17 ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे भरण्यासाठी कळविण्यात आले होते.  विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरण्याचा अंतिम मुदत सोमवार 11 सप्टेंबर 2023 पर्यत आहे.  माध्यमिक शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 पर्यत जमा करावी, असे लातूर विभागीय मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

इयत्ता 10 वीसाठी http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या  विद्यार्थ्यांचीनावनोंदणी करावी. इयत्ता 12 वीसाठी http://form17.mh-hsc-ac.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून येत आहे. आपल्या परिसरातील जास्तीत जास्त शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे खाजगी फॉर्म नं. 17 भरुन घेण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी त्यांच्या स्तरावरुन विविध माध्यमाद्वारे जनजागृती करुन जास्तीत जास्त विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कसे येतील याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1148 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी...