Monday, August 14, 2017

शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात सोमवार 14 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपासून मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर सोमवार 14 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजेपासून मंगळवार 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्याकडून देण्यात आली.
000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...