Friday, May 26, 2017

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी
कडक उपाय योजनांचा अवलंब
नांदेड, दि. 26 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी दुय्यम निरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा रविवार 28 मे 2017 रोजी होणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी आयोगाने कडक उपाय योजना केल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
रविवार 28 मे रोजी  सकाळी 10.30 ते दुपारी 12 यावेळेत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या पर्यवेक्षणावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाचे अधिकारी केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षेत गैर प्रकार केल्यास संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...