Friday, May 26, 2017

 चला गावाकडे जा-ध्‍यास विकासाचा घे
अभियानास नांदेड तालुक्यात धनगरवाडीतून प्रारंभ
नांदेड, दि. 26 :-  औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्‍पनेतशनिवार 20 ते सोमवार 29 मे 2017 या कालावधीत चला गावाकडे जा-ध्‍यास विकासाचा घे या अभियानाची सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी नांदेड तालक्‍यातील धनगरवाडी या गावी हे अभियान राबविले आहे.
श्रमदानाचे काम करुन या गावात एक दिवस मुक्‍काम केला. तेथील नागरीकांशी चर्चा करुन त्‍यांच्‍या डीअडचणी जाणुन घेतल्‍या व त्‍यांचे निरसण केले. पाणी टंचाई संदर्भात गावातील विहिरींची माहिती घेण्‍यात आली. एक नविन विंधन विहीर घेण्‍यास सांगण्‍यात आले. प्राधान्‍य कुटूंब लाभार्थी कमी असून बीपीएलचा एकही लाभार्थी या गावात नसल्‍यामुळे त्‍यांना या योजनेबाबत जागृत करुन लाभार्थी संख्‍या वाढविण्‍यासाठी सांगण्‍यात आले.
समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेमधील 11 कलमी कार्यक्रमाचे योजनानिहाय सर्व नागरीकांना मार्गदर्शन करण्‍यात आले. सिंचन विहीरीचे 2 लाभार्थी निवडण्‍यात आले. व्‍हर्मी कंपोस्‍टींग, नाडेफची कामे घेण्‍यास प्रोत्‍साह देण्‍यात आले. तर जिल्‍हा रेशीम विभागाच्‍यावतीने रेशीम कामासाठी 10 लाभार्थी निवडण्‍यात आले आहे. त्‍याअनुषंगाने सोमवार सकाळी 9 वा. या गावात एका विशेष कॅम्‍पचे नियोजन केले. त्‍यात रेशीम उद्योगाच्‍या कामास प्रोत्‍साहनासह नंदवन वृक्ष लागवडीच्‍या अनुषंगानेही माहिती देण्‍यात येणार आहे. या गावात मागल वर्षी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत 8 सिमेंट नाला बांधचे उद्दीष्ट आहे. त्‍यापैकी चार पूर्ण तर 4 प्रगतीपथावर आहेत. गावातील शौचालयाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.  
गटविकास अधिकारी एन. पी. घोलप यांनी खुरगाव हे गाव अभियानासाठी निवडून त्‍या गावात अभियान राबविले आहे. तसेच नांदेड तालक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीमध्‍ये हे अभियान राबविण्‍याकरीता ग्राम संपर्क अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहे. हे अधिकारी सोमवार 29 मे 2017 रोजी पर्यंत नेमुन दिलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये अभियान राबविणार आहेत.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...