Monday, April 7, 2025

वृत्त क्रमांक 358

 जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे

"समता पंधरवडा " विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड दि.  एप्रिल :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे"समता पंधरवडा" आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने एप्रिल ते 14 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या समता पंधरवड्यात विशेष मोहिमेतंर्गत जिल्हयातील इ.11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थीसीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे.
                                                                                                                               

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समतास्वातंत्र्यबंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केली आहे.  त्याअनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीवंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत.  यासर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यांचा प्रचारप्रसिध्दी व्हावीयासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध"समता पंधरवडा"कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.


समता पंधरवडयात सन 2024-25 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान संपूर्ण नांदेड जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. 

समता पंधरवडयात सन 2024-25 मधील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील तसेच सीईटी देणारे विद्यार्थीडिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज समितीकडे दाखल केलेले नाहीतअशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विशेष मोहिमेतंर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भरुन महाविद्यालयाकडे दाखल करावेत.  त्याच बरोबर अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष मोहिमेतंर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जमा करुन घेण्यात आलेले ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज प्रवर्गनिहाय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व अर्जावर समितीच्यावतीने तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन समितीचे कामकाज अधिक पारदर्शकलोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळू शकेल.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 758   जन्मजात दुभंगलेले ओठ ,   टाळू शस्त्रक्रियेसाठी  अकोला येथे   9   बाल कांवर होणार शस्त्रक्रिया   ·          राष्ट्री...