Saturday, January 7, 2017

  स्त्री रुग्णालय श्यामनगर येथे
रविवारी फेफरे-फिटची मोफत तपासणी
नांदेड, दि. 7 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ईपिलेप्सी फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 8 जानेवारी 2017 रोजी स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे भव्य ईपिलेप्सी (फेफरे / फिट) या आजाराबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            मुंबई येथील तज्ज्ञ न्युरोफिजिशियन डॉ. सूर्या यांच्यावतीने शिबिरात ईपिलेप्सी (आकडी) या आजाराबाबत तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.  शिबिरात रुग्णांची न्युरोलोजीस्टतर्फे मोफत ईईजी चाचणी, फ़िजिओथेरपी ओकुपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन व रक्त तपासणी तसेच रुग्णासाठी मोफत औषधी देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी व इतर ईपिलेप्सी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी ( बां. स.) डॉ. उत्तम इंगळे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...