Monday, February 12, 2024

वृत्त क्र. 125

 

महासंस्कृती महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दिनांक 15 ते 19 फेब्रुवारीला नांदेड येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासन सज्ज झाले असून यानिमित्ताने होणाऱ्या विविध आणखी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्तरावरील बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. महोत्सवात लक्षणीय कार्यक्रमांसोबतच प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचेस्थानिक खाद्य पदार्थतृणधान्याचे पदार्थबचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यात येणार आहे.

 

या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककलालोकसंगीतलोकनृत्यआदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...