Thursday, April 22, 2021

हनुमान जयंती साधेपणाने साजरा करावी - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

                                                    हनुमान जयंती साधेपणाने साजरा करावी

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  शासनाने कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्‍सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्‍यात येत आहेत. सध्‍या कोविड-19 च्‍या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्‍या अतिसंसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्‍या राज्‍यात तसेच मोठया शहरांमध्‍ये रुग्‍णांच्‍या संख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. त्‍यामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी मंगळवार 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती हा उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढीलप्रमाणे पाच मागर्दशक सूचनेनुसार कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

1.      कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्‍या घरी हनुमान जयंती उत्‍सव  साजरा करावा. 

2.      कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्‍थळे बंद ठेवण्‍यात आली असल्‍याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.

3.      मंदिरामधील व्‍यवस्‍थापक, विश्‍वस्‍त यांनी शक्‍य असल्‍यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादी द्वारे उपलब्‍ध करून द्यावी.                

4.    हनुमान जयंती उत्‍सवानिमित्‍त कोणत्‍याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत.   

5.     कोवीड-19 च्‍या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष सण  सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न   करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी , कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. 

0000

 

 

 

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...