Tuesday, February 16, 2021

 

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ.दिपक 
म्हैसेकर यांची

रयत बाजार विक्री केंद्रास भेट

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  कृषि विभागामार्फत विकेल ते पिकेल या अभियानातर्गंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेले संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान विक्री केंद्रास आज राज्याचे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली.

 

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी एम. के. सोनटक्के, तालुका कृषि अधिकारी एस. बी. मोकळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, संगणक अज्ञावली रुपरेषक यावेळी उपस्थित होते.

 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2021 या काळात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले आहे.  या ठिकाणी कायमस्वरुपी विक्री केंद्र सुरु करण्याबाबतच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी सात ते आठ स्टॉल कायमस्वरुपी सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला, ताजी फळे, सेंद्रीय शेतमाल, डाळी, धान्य, हळद ई. विक्रीसाठी ठेवला आहे. शहरातील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सदरील विक्री केंद्र हे सोमवार ते रविवार या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहाणार आहे. तरी शहरातील ग्राहकांनी मोठया संख्येने शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करावा असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. तसेच शेतकरी व आत्माचे शेतकरी गट यांनी त्यांचा माल मोठया प्रमाणावर विक्रीसाठी आणावा असे देखील आवाहन केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...