Wednesday, April 5, 2023

कोविडचे रुग्ण पुन्‍हा आढळून येत आहेत

घाबरु नका, काळजी घ्‍या

- जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- देशभरात कोरोना संसर्ग फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. नांदेड जिल्‍ह्यात मागील महिण्‍यापासून आजपर्यंत कोविडचे एकुण 30 रुग्‍ण आढळून आले आहेत. जिल्‍ह्यात कोविड व इन्‍फ्यूएंझा रोग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सर्व स्‍तरावर सुरु करण्‍यात आलेल्‍या आहेत.   यामुळे जनतेने घाबरुन न जाता काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

जिल्‍ह्यात मागील महिण्‍यापासून आजपर्यंत कोविडचे एकुण 30 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 19 रुग्‍ण आजारातून बरे झाले आहेत. 3 रुग्‍णांवर डॉ.शं.च.वै.म.व रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. 8 रुग्‍ण हे गृहविलगीकरणात ठेवण्‍यात आले आहेत.

 

नागरीकांनी अशी घ्यावी दक्षता  

गर्दीच्‍या आणि बंदिस्‍त ठिकाणी विशेषतः सह व्‍याधी असणाऱ्या व्‍यक्‍ती आणि वृध्‍द यांनी जाणे टाळावे. डॉक्‍टर, पॅरामेडीकल आणि रुग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक यांनी आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये / रुग्‍णालयात मास्‍कचा वापर करावा. गर्दीच्‍या आणि बंदीस्‍त ठिकाणी मास्‍क वापरावा. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्‍यासाठी रुमाल / टिश्‍यू वापरावा. हाताची स्‍वच्‍छता राखावीवारंवार हात धुवावेतसार्वजनिक ठिकाणी थुं‍कू नये. सर्दीखोकलातापअंगदुखीघशामध्‍ये खवखवणेश्‍वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत डॉक्‍टरांचा सल्‍ला घेवून लवकर कोवीड चाचणी करावी.  श्‍वसनाच्‍या आजाराने ग्रस्‍त असल्‍यास वैयक्तिक संपर्क मर्यादीत करावा. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. सर्व व्‍यक्‍तींनी कोविड बुस्‍टर डोस लसीकरण उपलब्‍ध झाल्‍यावर करावे. सौम्‍य लक्षणे असल्‍यास स्‍वतः खात्री करुन डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी. पुर्ण बरे होईपर्यंत स्‍वतः घरी अलगीकरण करण्‍याचे आवाहन आरोग्‍य प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 

इन्‍फ्यूएंझा ( फ्यू ) रुग्‍णांच्‍या प्रमाणात देखील वाढ

इन्‍फ्यूएंझा एच 3 एन 2 ( फ्यू ) या हंगामी तापाच्‍या रुग्‍णांच्‍या प्रमाणात देखील वाढ होताना दिसून येत आहे. आजपर्यत जिल्‍ह्यातील नांदेड तालुक्‍यात इन्‍फ्यूएंझा एच 3 एन 2 ( फ्यू ) एक रुग्‍ण आढळून आला आहे व तो बरा झालेला आहे. इन्‍फ्यूएंझा ( फ्यू ) हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. यामध्‍ये रुग्‍णाला ताप, खोकला, घशात खवखवधाप लागणेअंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. इन्‍फ्यूएंझाची लागण टाळण्‍यासाठी वारंवार साबण व स्‍वच्‍छ पाण्‍याने हात धुवावेतपौष्टिक आहार घ्‍यावाधुम्रपान टाळावेपुरेशी झोप आणि विश्रांती घ्‍यावीभरपूर पाणी प्‍यावेलिंबूआवळामोसंबीसंत्री, हिरव्‍या पालेभाज्‍या यासारख्या आरोग्‍यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. हस्‍तांदोलन टाळावेसार्वजनिक ठिकाणी थुंकू नयेफ्यू सदृश्‍य लक्षणे असतील तर गर्दीच्‍या ठिकाणी जाऊ नये असे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...