Thursday, April 6, 2023

सोमवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सोमवार 10 एप्रिल 2023 रोजी आयटीआय उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनांतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. फिटर, एसएमडब्लु, एमआरएसी, मेकॅनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन कोप्पा, टीडीएम, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, आयसीटी एस एम, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, मेकॅनिकल व सर्व आवश्यक ट्रेडसाठी एकूण 850 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...