डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 6 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ.पी. टी. जमदाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीचे अधिष्ठाता डॉ. संजय मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप बोडके तसेच सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम बाह्यरुग्ण विभागात भित्तीपत्रकाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. एमबीबीएस दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थांनी पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती केली. डॉ. पी.एल. गट्टानी यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जागतिक आरोग्य दिनाचे महत्व विषद केले.
मानवी जीवनात उत्तम आरोग्यासाठी केवळ रुग्णालयावर अवलंबून न राहता प्रत्यकाने स्वतः दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे असल्याचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात उद्भवणाऱ्या विविध आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संशोधनाचे योगदान महत्वाचे असल्याचे डॉ. संजय मोरे यांनी विषद केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप बोडके यांनी शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक स्वास्थ्य हे पण तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला डॉ. आर.डी. गाडेकर, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. महावीर नाकेल, डॉ. ज्योती भिसे, डॉ.मैदपवाड, डॉ.ओमप्रसाद दमकोंडवार तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक, नर्सिंग विद्यार्थी, एम.बी.बी.एसचे विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी.एल. गट्टानी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गीतांजली केंद्रे, सर्व निवासी डॉक्टर्स, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, अर्जुन राठोड, सा.आ. परिचारिका ममता उईके आणि बळीराम कांबळे व केशरबाई शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश्वर माचेवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. फेरोज खान यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment